वीरशैव लिंगायत धर्मपरंपरेतील तत्त्वविचार : अष्टावरणविज्ञान
Shivsharan Gurupadappa Ratkalkar
वीरशैव लिंगायत धर्मपरंपरेतील तत्त्वविचार : अष्टावरणविज्ञान
विशिष्ट विचारधारा व आचारमार्ग धारण करतो तो धर्म - अशी ढोबळ मानाने धर्माची व्याख्या करता येईल. तसे पाहता अनेक विचारवंतांनी धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. जसे की - ' *यतोऽभ्युदय नि:श्रेयस सिद्धि:सधर्म:* '
भावार्थ :
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती,अंगभूत गुणविशेष,सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती,अंगभूत गुणविशेष धारण करणारी एक विशिष्ट साचेबद्ध आचारसंहिता म्हणजे धर्म.
धर्म परंपरांना एक तात्त्विक बैठक असते. किंबहुना त्यामुळेच त्या त्या धर्मांना विशिष्ट महत्व प्राप्त झालेले असते. ठराविक जन समुदायाने स्वखुशीने स्वीकारलेली आचार विचार पद्धती म्हणजे धर्म, असेही म्हणता येईल. आपल्या भारतीय समाजरचनेत असे अनेक धर्म पंथ शतकानुशतके आपले अस्तित्व टिकवून आहेत. प्राचीन आणि अर्वाचिन धर्म परंपरेत सिंधू संस्कृती, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, शैव संस्कृतीत वीरशैव लिंगायत धर्म, शीख धर्म, म्लेन्च्छ मुस्लिम धर्म, ख्रिस्ती पारसी इसाई धर्म अशी अनेक नावे घ्यावी लागतील. कालपरत्वे बदलत गेलेली संस्कृती काही धर्म संपवण्यात यशस्वी झाली.याउलट ज्या धर्मांची तात्त्विक बैठक योग्य ते अनंतकाळ टिकून राहिले. त्यांना भरपूर अनुयायी मिळाले. ते मोठे आणि चिरंतन ठरले.
अशीच भव्य दिव्य परंपरा लाभलेल्या शैव संस्कृतीतील वीरशैव लिंगायत धर्माबद्दल आपण येथे चिंतन पाहणार आहोत.
प्राग्वैदिक काळापासून शैव संस्कृती शिव तत्त्वाचे विवेचन मांडत आलेली आहे. *शिव* हे एक शाश्वत तत्त्व आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या *अविनाभाव* संबंधातून सकल सृष्टीचा उद्गम झाला असे मानले जाते. उत्पत्ती - स्थिती - लय या तिन्हीस मूलाधार *शिवच* आहे. शिवापासून शक्ती आणि शक्तीपासून सृष्टीनिर्माता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि लयकर्ता महेश अशी व्यवस्था निर्माण झाली. असे पुरणादिकात उल्लेख आलेले दिसतात.
"वीरशैव लिंगायत धर्मपरंपरेतील तत्त्वविचार : अष्टावरणविज्ञान", IJSDR - International Journal of Scientific Development and Research (www.IJSDR.org), ISSN:2455-2631, Vol.10, Issue 1, page no.a79-a87, January-2025, Available :https://ijsdr.org/papers/IJSDR2501012.pdf
Volume 10
Issue 1,
January-2025
Pages : a79-a87
Paper Reg. ID: IJSDR_300144
Published Paper Id: IJSDR2501012
Downloads: 000347534
Research Area: Science and Technology
Country: -, -, India
ISSN: 2455-2631 | IMPACT FACTOR: 9.15 Calculated By Google Scholar | ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 9.15 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator
Publisher: IJSDR(IJ Publication) Janvi Wave